Ad will apear here
Next
करोनानंतरच्या काळात शिक्षण अधिक विद्यार्थिकेंद्री बनेल : डॉ. अभय जेरे


पुणे :
‘करोना साथीच्या काळानंतर शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीचे मिश्रण येईल आणि ती अधिक विद्यार्थिकेंद्री होईल. प्रश्न सोडविणारे, रोजगार निर्माण करणारे, तंत्रकुशल विद्यार्थी देशाला हवे असून, त्याकडे लक्ष द्यावे लागेल,’ असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांनी केले. 

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’तर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्युचर ऑफ एज्युकेशन सिस्टीम’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये ते बोलत होते. सरकारचे शैक्षणिक नियोजन, शैक्षणिक प्रणाली ४.०, ‘कोविड १९ नंतरची शैक्षणिक व्यवस्था’ या विषयावर वेबिनारमध्ये चर्चा झाली. 

डॉ. अभय जेरे
ते म्हणाले, ’देशात तांत्रिक प्रशिक्षण घेणारे ८० लाख विद्यार्थी आहेत. सर्वच विद्या शाखांत मिळून ७० टक्के विद्यार्थी रोजगारापासून वंचित आहेत. तरीही भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्ट-अप उद्योग असलेला देश आहे. इथून पुढे तंत्रकुशल आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर भर द्यावा लागेल. समस्या सोडविणारी, कल्पक, नव्या उद्योग संकल्पना मांडणारी पिढी हवी आहे. त्यांना व्यावसायिक पाठबळ देणारे इन्क्युबेटर लागतील.’ 

‘केंद्र सरकार नवे शैक्षणिक धोरण आणत आहे. पुढील पाच वर्षांत शिक्षण पद्धती अधिक विद्यार्थिकेंद्रित होईल. प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रगतीकडे ही शिक्षणपद्धती लक्ष देईल,’ असेही डॉ. जेरे यांनी सांगितले. 

‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’चे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप, समन्वयक सबा शेख यांनी या वेबिनारचे संयोजन केले. महाविद्यालयांचे प्राचार्य, प्लेसमेंट ट्रेनिंग ऑफिसर, विभागप्रमुख, प्राध्यापक, एचआर विभागप्रमुख या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZFDCN
Similar Posts
करोनाच्या पार्श्वभूमीवर नवोदितांना नोकऱ्यांसंदर्भात मार्गदर्शन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मोफत वेबिनार पुणे : करोनाच्या साथीमुळे उद्धवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. पदवी घेऊन करिअर सुरू करण्याच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. आपल्या प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना, नवी नोकरी कशी शोधायची, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहेत
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.
‘शिशिर रामेश्वरम नॅशनल टॅलेंट हंट’ शिष्यवृत्तीकरिता नोंदणी सुरू मुंबई : भारतीय संरक्षण दलांच्या परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या मुंबईतील सेंचुरियन डिफेन्स अकादमी या सेंचुरियन एज्युकेशन प्रा. लि.च्या संरक्षण विभागाने वर्ष २०२०साठी ‘शिशिर रामेश्वरम नॅशनल टॅलेंट हंट’ची (एसआरएनटीएच) नोंदणी सुरू केली आहे. संरक्षण दलात अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत संधी पुणे : ‘अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक, तसेच प्रात्यक्षिक ज्ञान घेणे खूप गरजेचे आहे. अभियंत्यांसाठी विविध पदांकरिता सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु माहितीअभावी अभियंते या क्षेत्राकडे वळत नाहीत. केवळ खासगी नोकऱ्या करण्यापेक्षा प्रशासकीय सेवांमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करावेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language